Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हनी ट्रॅपमध्ये अडकला नौदलाचा कर्मचारी! पाकिस्तानला दिली 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती

हनी ट्रॅपमध्ये अडकला नौदलाचा कर्मचारी! 
पाकिस्तानला दिली 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती

जयपूर : खरा पंचनामा

पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी इंडियन नेव्हीच्या एका कर्मचाऱ्याला जयपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा कर्मचारी दिल्लीच्या नौदलाच्या मुख्यालयात तैनात आहे. त्याच्यावर आरोप आहेत की त्यानं संरक्षण खात्यासंदर्भातील अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानी हँडर्सना पुरवली आहे. विशेषः म्हणजे हनी ट्रॅपमध्ये तो अडकला असून त्यानं ऑपरेशन सिंदूरबाबतची माहितीही पुरवली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, विशाल यादव असं या नौदल कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो हरयाणातील रेवाडीचा रहिवासी आहे. अटकेनंतर तपास यंत्रणा त्याची कसून चौकशी करत आहेत. दिल्लीतील नौदल भवनातील डॉकयार्ड डिरेक्टोरेटमध्ये तो अप्पर डिव्हीजन या पदावर तैनात आहे. सीआयडीचे अधिकारी आयजीपी विष्णुकांत गुप्ता यांनी सांगितलं की, यादवने पाकिस्तानी एजंट असलेल्या एका महिलेला भारताच्या संरक्षणाशी संबंधी संवेदनशील माहिती पुरवली.

गुप्ता यांनी पुढे सांगितलं की, यादवने हे मान्य केलं आहे की, त्यानं संवेदनशील माहिती पाकिस्तानी महिला एजन्टला दिली आहे. त्या बदल्यात त्याला २ लाख रुपये मिळाले. यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत माहिती देण्यासाठी त्याला अधिकचे ५० हजार रुपये मिळाले आहेत. त्याला या पैशांपैकी काही पैसे हे क्रिप्टोकरन्सीद्वारे मिळाले आहेत.

पीटीआयनं सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात फेसबूकच्या माध्यमातून झाली. एका पाकिस्तानी एजंटनं फेसबूकवर प्रिया शर्मा नावानं बनावट आयडी तयार केला आणि विशाल यादवला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली. काही दिवसांनंतर त्या दोघांमध्ये सातत्यानं चर्चा सुरु झाली. त्यानंतर ते व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर देखील चर्चा करु लागले.

सुरुवातीला विशाल यादवला थोडी थोडी रक्कम मिळत होती. यामध्ये ५००० ते ६००० रुपये अशी होती. थोडी कमी महत्वाच्या माहितीसाठी त्याला हे पैसे मिळत होते. पण या पाकिस्तानी एजंटनं त्याला एकदा काहीतरी निश्चित अशी माहिती विचारली आणि त्यासाठी जास्त पैसे देण्याचं लालूच दाखवलं. त्यानंतर विशालनं संरक्षण क्षेत्राशी संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवायला सुरुवात केली. सोशल मीडियावरील त्याच्या संशयास्पद वावराची देखरेख केल्यानंतर हे कन्फर्म झालं की त्यानं पाकिस्तानी एजंटला महत्वाची माहिती पुरवली आहे. त्यानंतर त्याला अधिकच्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं.

विशाल यादव याला ऑनलाईन गेमिंगचा नाद होता. याच गेम्सच्या नादात तो पाकिस्तानी गुप्तहेरांच्या जाळ्यात फसला. त्याच्या फोनची फॉरेन्सिक चाचणी केल्यानंतर याबाबत महत्वाचे पुरावे समोर आले आहेत. यामध्ये फायनान्शिअल ट्रान्झक्शन, इन्क्रिप्टेड चॅट आणि संरक्षणविषयक संबंधीत मोठी माहिती आढळून आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.