"फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडालीय"
मुंबई : खरा पंचनामा
'फडणवीसांनी दिलेल्या धमकीमुळे आमची झोप उडालीय. आता आमचं कसं व्हायचं!' असा चिमटा आज शरद पवार यांनी काढला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध कराल तर याद राखा', अशी धमकी विरोधकांना नुकतीच दिली होती.
या वक्तव्याचा शरद पवार यांनी समाचार घेतला. शक्तिपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. या महामार्गाची आवश्यकता आहे का? यासाठी कोल्हापूरच्या लोकांसोबत मी बोलणार आहे. त्यानंतर सरकारचे म्हणणेही आम्ही समजून घेऊ, असेही शरद पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.