जयश्रीताई पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचे जैन समाजाच्या वतीने स्वागत
सांगली : खरा पंचनामा
श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला असून, या प्रवेशानिमित्त जैन समाजाच्या वतीने त्यांचे महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री. रावसाहेब पाटील यांनी स्वागत केले. भाजपा जैन प्रकोष्ठाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे भाजपा जैन प्रकोष्ठ प्रमुख प्रशांत गोंडाजे यांनी श्रीमती जयश्रीताई पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी. रावसाहेब पाटील यांनी मनोगतात सांगितले की, माननीय वसंतदादा, विष्णू अण्णा, प्रकाश बापू, मदन भाऊ यांनी जैन समाजाच्या नेतृत्वाला नेहमी बळ दिलेले आहे जैन समाजाच्या कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे, भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. विशेषतः जैन समाजासाठी स्वतंत्र जैन प्रकोष्ठ व 'महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून पक्षाने जैन समाजाला गौरवाचे स्थान दिले आहे. आता आपणा सर्वांनी मिळून देशाच्या आणि आपल्या परिसराच्या विकासासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे."
प्रशांत गोंडाजे यांनी जयश्री ताईंचे पक्षात स्वागत करताना," जयश्रीताई सारख्या नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळे पक्ष अधिक बळकट होईल," असे सांगितले.
या प्रसंगी जयश्रीताई पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना पक्षामार्फत मिळणाऱ्या संधींचा उपयोग समाजहितासाठी करणार आहे. असे सांगितले
माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांनी विशेषता जैन कार्यकर्त्यांना दिलेल्या संधीची माहिती दिली आणि जैन प्रकोष्ठ आणि महामंडळाच्या वतीने जयश्रीताई वहिनी यांचे स्वागत केल्याबद्दल आभार मानले.
या प्रसंगी सागर पाटील, हर्षद पाटील, प्रमोद शेटे, विपुल पाटील यांच्यासह भाजपा जैन प्रकोष्ठ चे शहर जिल्हाध्यक्ष वैभव चौगुले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शितलकुमार, महेश मुळे सचिव, महानगर अध्यक्ष शांतिनाथ कर्वे, महिला संयोजिका सांगली शहर सौ स्वाती कोल्हापुरे, संतोष कोल्हापुरे, भालचंद्र बक्षी, शांतिनाथ पाटील व जैन समाजातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.