Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवसृष्टीच्या फलकावर लघुशंका, शिवभक्तांमध्ये प्रचंड संताप; दाम्पत्याला ठोकल्या बेड्या

शिवसृष्टीच्या फलकावर लघुशंका, शिवभक्तांमध्ये प्रचंड संताप; दाम्पत्याला ठोकल्या बेड्या

पुणे : खरा पंचनामा

आंबेगाव बुद्रुक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित स्मारक असलेल्या शिवसृष्टी बाहेरील सूचना फलकावर लघुशंका केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या दाम्पत्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शनिवारी (दि.३१) पहाटे हा प्रकार घडला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या कृत्यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

अमोल अरुण कुलकर्णी (वय ५९, रा. धायरी) आणि त्यांची पत्नी स्नेहा अमोल कुलकर्णी (वय ५७) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्याचे नावे आहेत. याबाबत नयनाथ तुकाराम अमराळे (वय २३) यांनी तक्रार दिली आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अमोल हे सरकारी सेवेतून निवृत्त झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, तक्रारदार अमराळे हे त्यांच्या मित्रासह नवले ब्रिजहून निघाले होते. ते शिवसृष्टीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून जात असताना तेथे दोन चारचाकी वाहने उभी असल्याचे त्यांना दिसले. त्यातील एका गाडीशेजारी एक वयोवृद्ध पुरुष थेट सूचना फलकावर लघुशंका करत होते. तर त्यांच्यासोबत एक महिला शेजारी उभी होती. त्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधितांनी आपली ओळख सांगितली. हा सर्व प्रकार अमराळे यांनी मोबाइलमध्ये शूट केला. नंतर याची माहिती पोलिसांना दिली.

भारती विद्यापीठ पोलिसांनी अमोल कुलकर्णी यांच्यासह पत्नीला अटक केली. अमोल दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक शक्यता वर्तविली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी दाम्पत्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.