'मी तर माझं काम करून मोकळा...'
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं चित्र आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आणि अजित पवारांची आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या एकत्रिकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात खळबळजनक दावा केला आहे.
आमचा अयोध्येचा दौरा (2022) होता. शिवसेनेचे सर्व नेते अयोध्येला गेले होते. शेवटचा दौरा होता. त्यानंतर ते गेले (फुटले). तेव्हा ते माझ्या खोलीमध्ये येऊन मला कन्व्हिन्स करत होते. ते घाबरुनच तिकडे गेले. एकनाथ शिंदे म्हणाले, माझं तुरुंगात जायचं वय नाही. बहुतेक हे मी पुस्तकात लिहिलंय. हे माझं तुरुंगात जायचं वय नाही, आता मला नातवंडं झाली आहेत. मी म्हटलं मला पण नातवंडं झाली आहेत, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला, त्यावरती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
"ते काय म्हणाले त्याबाबत त्यांनाच विचारा. मला का विचारत आहात. मी तर माझं काम करून मोकळा झालो. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून कोणाशी सोयरीक केली, जे बाळासाहेब ठाकरेंना कधीच नको होतं, त्यांच्यासोबत तुम्हा सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी गेलात, त्यामुळे आम्ही त्यावर काय बोलणार. बाळासाहेबांच्या नावाला ज्यांनी बट्टा लावला, ते तुमच्या कार्यक्रमात येऊन असंच खोटं बोलणार", असं एकनाथ शिंदे संजय राऊतांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणालेत.
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र. तो मला पण सांगत होता की तू पण चल. आमचा अयोध्येचा दौरा (2022) होता. शिवसेनेचे सर्व नेते अयोध्येला गेले होते. शेवटचा दौरा होता. त्यानंतर ते गेले (फुटले). तेव्हा ते माझ्या खोलीमध्ये येऊन मला कन्व्हिन्स करत होते. ते घाबरुनच तिकडे गेले. एकनाथ शिंदे म्हणाले, माझं तुरुंगात जायचं वय नाही. बहुतेक हे मी पुस्तकात लिहिलंय. हे माझं तुरुंगात जायचं वय नाही, आता मला नातवंडं झाली आहेत. मी म्हटलं मला पण नातवंडं झाली आहेत. ज्या पक्षाने तुम्हाला इतकी वर्ष दिलं आहे, त्यांच्या छातीवर पाय ठेवून बाहेर पडणं हे म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना प्रतारणा केल्यासारखं आहे. तुम्ही सुद्धा धीर धरा, शांत राहा आणि घाबरु नका. आता हे ज्यावेळी मी सांगतो, त्यावेळी पक्ष फुटला का? ते डरपोक लोक आहेत म्हणून गेले, असं संजय राऊत म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.