Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कांटा गर्ल शेफाली जरीवालाचे निधन, शेवटची Insta पोस्ट व्हायरल

कांटा गर्ल शेफाली जरीवालाचे निधन, शेवटची Insta पोस्ट व्हायरल

मुंबई : खरा पंचनामा

मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'कांटा लगा' या गाण्यातून प्रसिद्धी झोतात आलेली बिग बॉस 13 फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे. माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 42 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला आहे.

अभिनेत्रीची तब्येत अचानक खालावल्याने तिचा पती पराग त्यागीने तिला उपचारासाठी मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या निधनाचे वृत्त समोर येताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेफालीच्या निधन वार्तेला बिग बॉसचे स्पर्धक राजीव अदातिया, अली गोनी आणि मिका सिंग यांनी दुजोरा दिला आहे. तसेच शेफालीचा पती परागचा रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेफालीच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर तिचा मृतदेह कूपर रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सोशल मीडियावर शेफालीच्या निधनाची बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी विविध पोस्टच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

शेफाली जरीवालाने 3 दिवसांपूर्वी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने स्वतःचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. सोबत 'Bling it on baby' असे कॅप्शन दिले होते. शेफालीची ही पोस्ट तिची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट ठरली आहे. दरम्यान, शेफाली जरीवाला ही 2002 साली आलेल्या 'कांटा लगा' या अल्बम सॉन्गमधून प्रकाशझोतात आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.