सांगलीत घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक
1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त : विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विश्रामबाग परिसरातील कारखाना फोडून त्यातील तांब्याच्या तार चोरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक दुचाकी, मोपेड, चोरीच्या तारा असा 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.
निखिल मिरासाब माडीग (वय २१, रा. शांतीनगर, ४ थी गल्ली मद्रासी कॉलनी सांगली), अनिकेत आकाश साबळे (वय २३, रा. १०० फुटी रोड, विज बोर्डचे पाठीमागे, शाहुनगर सांगली), राजु अशोक सोनावले (वय २३, रा. १०० फुटी रोड, नुरानी मस्जिद जवळ, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्रामबाग येथील परफेक्ट कंट्रोल सिस्टीम या कारखान्यात चोरी झाल्याची तक्रार सतिश शिंदे यांनी दिली होती. यातील चोरट्याना पकडण्याच्या सूचना निरीक्षक भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.
शाखेतील दिनेश माने, महमद मुलाणी, प्रशांत माळी यांना ही चोरी निखिल माडीग याने केल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने अन्य दोन साथीदारांसह मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर अन्य दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या तारा, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोपेड असा 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन माने, दिनेश माने, संदिप साळुंखे, अमर मोहिते, बिरोबा नरळे, मंहमंद मुलाणी, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, सचिन घोदे, सुनिल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.