शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंद, वाहतूक मार्गात मोठा बदल
कोल्हापूर : खरा पंचनामा
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सोमवारी (ता.१) होणाऱ्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे करण्यात आले आहे.
इंडिया आघाडी, सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटनांसह विविध संघटनांतर्फे रास्ता रोको व चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनामुळे गैरसोय होऊ नये व वाहतुकीची कोंडी टाळावी, या उद्देशाने हा वाहतूक मार्गात बदल केला आहे.
प्रवेश बंद मार्ग (कंसात पर्यायी मार्ग)
लक्ष्मी टेकडीमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद (फाईव्ह स्टार एमआयडीसी, हुपरी, इचलकरंजी, वाठार पूल)
उजळाईवाडी ओव्हरब्रिजखाली सर्व वाहनांना बंदी (शाहू टोल, ताराराणी चौक, शिये फाटामार्गे राष्ट्रीय महामार्ग)
वाठार ब्रिज- सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद (वाठार ब्रिज, वडगाव, हातकणंगले)
शिये फाटा- कागलकडे जाणारी वाहने प्रवेश बंद (शिये फाटा, कसबा बावडा, ताराराणी चौक, सरनोबतवाडी ब्रिज / शाहू टोल नाका)
तावडे हॉटेल - सांगली फाटामार्गे जाणारी वाहने प्रवेश बंद (ताराराणी चौक, पोलिस अधीक्षक कार्यालय, कसबा बावडा, शिये फाटा)
सांगली फाटा ब्रिज- तावडे हॉटेलकडे जाणारी वाहने प्रवेश बंद (शिरोली एमआयडीसी, कसबा बावडा, पोलिस अधीक्षक कार्यालय, ताराराणी चौक)
इचलकरंजी फाटा - कागल, बेळगावकडे जाणारी वाहने प्रवेश बंद (इचलकरंजी फाटा, कबनूर)
हातकणंगले- पुण्याकडे जाणारी वाहने (वडगाव, वाठार ब्रिज)
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.