Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'बावनकुळे काटेचे गॉडफादर, तपास अधिकारी नातेवाईक''तो' व्हिडिओ दाखवत गायकवाडांचे खळबजनक आरोप

'बावनकुळे काटेचे गॉडफादर, तपास अधिकारी नातेवाईक'
'तो' व्हिडिओ दाखवत गायकवाडांचे खळबजनक आरोप

पुणे : खरा पंचनामा

दीपक काटे हा गुन्हेगार आहे. काटेवर स्वतःच्या भावाची हत्या, खंडणी असे गंभीर गुन्हे आहेत. तरीही भाजपच्या युवा मोर्चाचं सरचिटणीस पद दिले आहे. काटे हा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत सातत्याने दिसला आहे.

त्यामुळे दीपक काटेसह अन्य गुन्हेगारांना शिक्षा करतील, मकोका लावलीत, हे मला वाटत नाही. संबंधित प्रकरणाचे तपास अधिकारी ढाकणे हा चंद्रशेखर बावनकुळेंचा नातेवाईक आहे. हा नियोजितपूर्व हल्ला होता, असे खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केले आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

प्रविण गायकवाड यांनी बावनकुळे यांचे दीपक काटेबद्दल बोललेले काही व्हिडिओही दाखवले आहेत. तसेच, अक्कलकोट येथील कार्यक्रमाचे आयोजन करणारे जनमजेय भोसले यांच्याबद्दल शंकाही गायकवाड यांनी उपस्थित केली आहे.

प्रविण गायकवाड म्हणाले, "जनमजेय भोसले यांची इच्छा होती की माझा सत्कार झाला पाहिजे. हा पुरूषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते होणार होता. पण, खेडेकर हे कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत. या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित होते. तेथे गेल्यावर पहिल्यांदा माझ्यावर हल्ला करण्यात आला. मी कारमध्ये बसलो, तर दीपक काटे याने माझ्यावर हल्ला केला. जनमजेय भोसले यांचा सत्कार कार्यक्रम झाला. तिथे कुठलाही निषेध नोंदवण्यात आला नाही. आयोजकांनी कुठलीही पोलीस तक्रार केली नाही. या परिस्थितीत तिथे चार ते पाच तास होतो."

"भाजपच्या पीआर कंपनीने संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून बातमी व्हायरल केली. याचा काय अर्थ घ्यायचा? मी जिवंत आहे, हे माझ्यावर समाजाचे प्रेम आहे. दीपक काटे हा गुन्हेगार आहे. काटेवर स्वतःच्या भावाची हत्या, खंडणी असे गंभीर गुन्हे आहेत. तरीही भाजपच्या युवा मोर्चाचं सरचिटणीस पद दिले आहे. काटे हा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत सातत्याने दिसला आहे. दीपक काटे याच्याकडे दोन पिस्तूल आणि २८ काडतुसे पुणे येथील विमानतळावर सापडली. मग, त्याला अटक झाली. पण, न्यायालयासमोर दीपक काटे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आणली नाही. ती समोर आणली तर दीपक काटे हा जामीनावर सुटला नसता. काटे याला मकोका लावून तुरुंगात डांबलं पाहिजे होता. दीपक काटे हा हस्तक आहे," असे गायकवाड यांनी म्हटलं.

यावेळी प्रविण गायकवाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ दाखवला आहे. त्यात बावनकुळे म्हणतात की, 'दीपकअण्णाचा मला गर्व आहे, त्याला कुणीतरी गुन्हेगार ठरवलं होतं. गुन्हेगार ठरवून त्याच्यावर मागच्या सरकारच्या काळात अन्याय केला. मी दीपकला सांगितलं होतं, काही चिंता करण्याची गरज नाही. देवेंद्रजी आणि मी आपल्या पाठीमागे उभा आहे.'

"संभाजी ब्रिगेड, बामसेफ आणि वंचित बहुजन आघाडीचा बंदोबस्त करण्यासाठी मागील महिन्यात एक बैठक झाली होती. खरेतर दीपक काटेला आर्म अॅक्टनुसार जामीन मिळू शकत नाही. मग, काटेला जामीन कुणी दिला? काटे हा बावनकुळेंना 'गॉडफादर' म्हणतो. गॉडफादर म्हणतात, 'तुम्ही काहीही करा, तुमच्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत. मी स्वतः आहे.' आमची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वैचारिक लढाई आहे. मागच्या काही महिन्यांपासून दीपक काटे हा मागणी करतोय की, 'संभाजी ब्रिगेड' नावातून छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख होत आहे. पण, १० वर्षांपूर्वी मुंबईत 'छत्रपती संभाजी ब्रिगेड' ही संघटना सचिन कांबळे यांनी रजिस्टर केली आहे. त्यामुळे आमच्या आणि कांबळे यांच्या संघटनेत 'छत्रपती' शब्दाचा अंतर आहे. पण, तो 'छत्रपती' शब्द आम्हाला मिळवायचा असेल तर कांबळे यांनी संमती दिली पाहिजे," असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.