ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या कर चोरीचा केंद्रीय जीएसटी कडून पर्दाफाश
संशयीताकडून पाच कोटींची रोकड व विनापरवाना पिस्तूल जप्त
पुणे : खरा पंचनामा
ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून शासनाची कोट्यवधी रुपयांची करचोरी केल्याप्रकरणी पुण्याच्या केंद्रीय जीएसटीच्या गुप्तचर पथक (DGGI) यांनी धाड टाकत सुमारे पाच कोटींची रोकड जप्त केली आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळाली गावात राबविण्यात आलेल्या या धाडसत्रानंतर संशयित युवक श्रीकांत प्रसाद पन्हे (रा. कपालेश्वर सोसायटी, देवळाली गाव) याला पथक पुण्यात चौकशीसाठी घेऊन गेले आहेत.
संशयित युवक विनापरवाना ऑनलाइन गेमिंग करीत असल्याचे संशयावरून सदरची धाडसत्र कारवाई करण्यात आली व ती दोन दिवस सुरू होती. जीएसटी'चे बनावट सॉफ्टवेअर बनवून त्याद्वारे शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथील सदर पथकाने त्याच्या घरातून परवाना नसलेले पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या 'जीएसटी' फसवणूक प्रकरणात. 'जीएसटी'साठी बनावट सॉफ्टवेअर आणि करपावत्या बनवून लाखोंचा कर चुकविल्याचा पथकाचा संशय आहे.
'सूत्रांच्या माहितीनुसार, संशयित श्रीकांत पन्हे याच्यावरील छाप्यात 'जीएसटी'च्या महत्त्वाची कागदपत्रे, हार्डडिस्क जप्त केली गेली आहे. पथकाने त्याच्या फ्लॅटसह कार्यालयावर एकाच वेळी छापा टाक शोधमोहीम राबविली. माहितीनुसार, संशयित श्रीकांत हा ऑनलाईन गेमिंग करीत होता. त्यासाठी त्याने शासनाचा परवाना घेतलेला नव्हता. त्यातून त्याने शासनाची कोट्यवधी रुपयांची करचोरी केली होती. सदरची बाब पुण्याच्या सेंट्रल जीएसटीच्या गुप्तचर विभागाच्या लक्षात आली होती. याप्रकरणी पथकाने देवळाली गावातील श्रीकांतच्या घरावर धाड टाकली. त्याचवेळी पथकाने त्याचे मूळ गाव असलेल्या कोपरगावातही धाड टाकली. या दोन्ही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत राबविण्यात आलेल्या धाडसत्रामध्ये पथकाने सुमारे पाच कोटींची रोकड जप्त केली आहे. तर याशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस, लॅपटॉप, संगणक यासह पेन ड्राईव्ह असे साहित्य जप्त केले आहे. संशयित युवकाला रात्री उशिरा पथकाने ताब्यात घेत पुण्याला नेले आहे. तर विनापरवाना पिस्तुल याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
फार्मसीचे शिक्षण घेतलेला संशयित श्रीकांत पहें याने संगणकाचा कोर्स केला होता. व ऑनलाइन गेमिंगमध्ये अधिकचे ज्ञान घेत अवैधरीत्या व्यवसाय सुरू केला होता. ऑनलाइन गेमिंगवर शासनाकडून २८ टक्क्यांचा कर आकारला जात असताना संशयित श्रीकांत याने परवाना न व्यवसाय सुरू केला होता. ऑनलाइन गेमिंगवर शासनाकडून २८ टक्क्यांचा कर आकारला जात असताना संशयित श्रीकांत याने परवाना न घेता शासनाची कोट्यवधींची करचुकवेगिरी केल्याचे जीएसटीच्या तपासातून समोर आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.