शेतात केली चक्क भाजपच्या झेंड्याची लागवड
कारंजा : खरा पंचनामा
शेतमालाला मिळत नसलेला भाव व निसर्गाची अनियमितता असूनही होत नसलेली कर्जमाफी यामुळे तालुक्यातील सुकळी येथील शेतकऱ्याने आपल्या तीन एकरात भाजपाचे झेंडे रोवत विषेध नोंदवण्याचा अजब प्रकार पहायला मिळाला.
तालुक्यातील सुकळी येथील शेतकरी प्रकाश चौधरी यांनी मंगळवारी (ता. ८ जुलै) आपल्या ४ एकर शेतात चक्क भाजपाच्या झेंड्याची लागवड केली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी अनियंत्रित कायदा सुव्यवस्था, दिव्यांगाची हेळसांड, जातिवाद, शेतकरी शेतमजूर आत्महत्या, बेरोजगारी, धिम्म प्रशासन व असुरक्षित महिला यासह शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्व. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळ येथून पहिली शेतकरी आत्महत्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण पर्यंत पायदळ यात्रा सुरू केली आहे.
८ जुलै रोजी ही पायदळ यात्रा कारंजा तालुक्यातील सुकळी येथे पोहोचली असता शेकडो शेतकऱ्यांच्या व बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेतकऱ्याने सुकळी येथे चार एकरात चक्क भाजपाच्या झेंड्याची लागवड केली.
सुकळी येथे स्थानिक शेतकरी प्रकाश चौधरी यांचे चार एकर एवढे शेत असून त्यातील तीन एकर शेतात भाजपाच्या झेंड्याची लागवड करण्यात आली. रासायनिक खते व बी बियाण्यांच्या वाढत्या किमती, सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन न पाळणे, शेतमालाला नसलेले भाव, वन्य प्राण्यांचा उपद्रव, नैसर्गिक संकटांमुळे होत असलेले अल्प उत्पन्न यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोट्यात जात आहे.
किमान सत्तेवर असलेल्या भाजपाच्या झेंड्याची लागवड केल्यास तरी उत्पन्न वाढेल आणि शेतमालाला भाव मिळेल या आशेने उपस्थित शेतकऱ्यांनी भाजपाच्या झेंड्याची लागवड केल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.