महाराष्ट्राचा नेता उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर
दिल्ली : खरा पंचनामा
जगदीप धनखड यांनी आज उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार संभाव्य नावामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. जर बागडे यांची या पदासाठी निवड झाली तर ते या पदावर पोहचणारे ते पहिले महाराष्ट्रीयन असणार आहे.
हरीभाऊ बागडे यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून 2014 ते 2019 पर्यंत काम पाहिले आहे. त्याआधी ते 1995 ते 99 या कालावधीत राज्याचे मंत्री देखील होते. तर 27 जुलै 2024 रोजी त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती.
तर आता प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केल्याने हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे नव्या उपराष्ट्रपतीची निवडणूक संसदेच्या आजपासून सुरु झालेल्या अधिवेशनातच होऊ शकते. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे सदस्य मतदान करतात. बागडे यांनी सध्या राजस्थानात आपला चांगला जम बसवला आहे. मेवाड दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील माती आपल्या कपाळाला लावून राजस्थानमधील जनतेची मने जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आमित शाह या दोघांशीही त्यांचे चांगले संबंध आहे.
तर दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे देखील नाव या पदासाठी नाव समोर येत आहे. नितीश कुमार यांना देशातील क्रमांक दोनचे पद देऊन आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मोठी खेळी खेळणार असल्याचे बोलले जात आहे. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी नितीश कुमार यांना केंद्रात आण्याची भाजपची योजना असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून समोर येत आहे.
हरिभाऊ बागडे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1944 रोजी झाला. 1985 मध्ये ते पहिल्यांदा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून आमदार झाले. 1995 मध्ये युतीमध्ये हरिभाऊ बागडे हे रोहयो मंत्री होते. तर 2009 मध्ये त्यांचा फुलंब्री विधानसभा मतदार संघातून पराभव झाला होता. तर 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी सलग दोनदा विजय मिळवला. 2014 साली त्यांना विधानसभेचे अध्यक्षही करण्यात आले. सध्या ते राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.