हनी ट्रॅप प्रकरणात नवीन वळण, करुणा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट; पुरव्यासकट करणार खुलासा
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या राजकीय वर्तुळात हनी ट्रॅपने वादंग उठले आहे. महायुती सरकारचा पायाच हनी ट्रॅपवर असल्याचा घणाघाती आरोप विरोधकांनी केलाय. काही आमदार आणि अधिकाऱ्यांच्या 'रासलीला' या पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. परमोच्च क्षण कैद झाल्यानेच अनेक जणांनी महायुतीला टेकू लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यातच करुणा मुंडे यांनी या वादात उडी घेतली आहे. एका पीडितेसह त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात अनेक गौप्यस्फोट केले.
एका एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याचा फोटो दाखवत या पीडित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. कळवा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यावर त्यांनी आरोप केले. मोबाईल नंबर घेत त्यांनी मॅसेज केले. पोलीस ठाण्यात चहा घ्यायला बोलावले. या अधिकाऱ्याच्या बायकोने फोनवरून घरी चहा प्यायला बोलावले. तिथे त्यांची बायको नव्हती. तर अधिकाऱ्याने पाण्यात गुंगीची गोळी टाकून मला बेशुद्ध केले. दोघांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले, असा आरोप महिलेने केला आहे. मी दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेली. तिथे कोणीच तक्रार घेतली नाही. पुढे वरिष्ठांकडे धाव घेतली. पण कोणीच दखल घेतली नाही. पोलीस महासंचालक, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केल्यावर चौकशीला बोलावण्यात आले. पुरावे दिले. पण पोलिसांनी मलाच धमकावले असा आरोप पीडितेने केला. माझ्या पेनड्राईव्ह मध्ये पुरावे आहेत. चांगला अधिकारी कोण नाही करणार. हवालदार च कोणी आहे का कोणी असं काही केलं असं. चांगला अधिकारी महिलांच्या विरोधात असं करणार नाही. उलट आपल्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे म्हणणे महिलेने मांडले.
करुणा मुंडे यांनी या पीडितेवर अन्याय करणाऱ्या पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. हनी ट्रॅप मध्ये आमदार खासदार अधिकारी असणार. हनी ट्रॅप करतात मन भरलं की त्यांना हे ट्रॅप वाटत. महिलांवर हनी ट्रॅप चे नाव देऊ शकत नाही. 6 महिन्यापासून ही महिला फिरतेय. महिला कैद्यांवर तुरुंगात सुद्धा अत्याचार होत असल्याचे कोणीतरी मला पाठवलं आहे. अनेक महिलांवर असे अन्याय होत आहे. पण त्यांना कोणी न्याय देत नाही. प्रत्येकाचे हात दगडाखाली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांची वेळ मागितल्याचे मुंडे म्हणाल्या. स्वराज्य पक्ष सेना माध्यमातून याप्रकरणी दाद मागत आहोत. येत्या 8 दिवसांत जर गुन्हा दाखल नाही झाला तर मी डीसीपी ऑफिसला आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.