सांगलीत बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या एकाला अटक
इनोव्हासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त : एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील गणेशनगर येथे इनोव्हा कारमधून बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून विविध कंपन्यांची दारू तसेच कार असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
अझहर दाऊद लांबे (वय ३५, रा. ५ वी गल्ली, गणेशनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अवैध दारू वाहतूक, विक्री, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचे एक पथक तयार केले होते. पथकातील अतुल माने, विनायक सुतार यांना गणेशनगर येथे एकजण इनोव्हा कार (एम एच १० डी.टी. ८८८६) मधून बेकायदा विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने गणेशनगर येथे छापा टाकून इनोव्हा कार पकडली. गाडीची तपासणी केल्यावर त्यात विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या सापडल्या. पथकाने लांबे याला अटक करून कार आणि 21 हजारांची दारू जप्त केली. त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर, गुंडोपंत दोरकर, अतुल माने, बाबासाहेब माने, रणजित जाधव, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, विनायक सुतार, सुमित सुर्यवंशी, सोमनाथ पतंगे, रुपेश होळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.