रेव्ह पार्टीतील 'त्या' तरुणी कोण?
क्रिकेट बुकीही सापडला!
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील खराडी परिसरात एका आलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. रविवारी मध्यरात्री केलेल्या या धडक कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या पार्टीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्काचे सेवन सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून कोकेन, गांजासह मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारूच्या बाटल्या, हुक्का पॉट आणि लाखो रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून, यात दोन तरुणींचाही समावेश आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन तरुणींची नावे समोर आली आहेत. त्यातील एक तरुणी ईशा देवज्योत सिंग (वय २२, रा. कुमार बिर्ला सोसायटी, नागरस रोड, औंध) तर दुसरी तरुणी प्राची गोपाल शर्मा (वय २३, रा. गोदरेज ग्रीन को., म्हाळुंगे) अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघीही रेव्ह पार्टीत सहभागी होत्या आणि अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी सुरू केली असून, या पार्टीत त्यांचा सहभाग कसा होता, याबाबत अधिक माहिती गोळा करत आहेत.
पुण्याच्या खराडी येथील रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. या फ्लॅटमध्ये पोलिसांना २.७ ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, एक हुक्का पॉट, विविध हुक्का फ्लेवर्स, मोठ्या प्रमाणात दारू आणि बिअरच्या बाटल्या तसेच तब्बल ४१ लाख रुपयांची रोकड सापडली आहे. याशिवाय, १० मोबाईल फोन आणि दोन चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा वापर आणि गैरव्यवहार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या रेव्ह पार्टी प्रकरणाला आता राजकीय आणि बुकी कनेक्शनमुळे नवीन वळण लागले आहे. अटकेत असलेल्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांपैकी एक जण क्रिकेट बुकी असल्याचेही समोर आले आहे. या बुकीवर यापूर्वीही पुण्यातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रांजल खेवलकर यांच्या नावावरच या लॉजमधील खोल्यांचे बुकिंग करण्यात आले होते, हे देखील समोर आले आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.