Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना मकोका लागणार!

ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना मकोका लागणार!

मुंबई : खरा पंचनामा

राज्यात होत असलेल्या ड्रग्सच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्यातील ड्रग्सची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललण्याने ड्रग्स तस्करांचे धाबे चांगलेच दणाणार आहेत.

आज विधान परिषदेत राज्यात होणाऱ्या एमडी ड्रग्सच्या तस्करीवरून चर्चा झाली. या चर्चांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. मोठ्या केसेससाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाजपचे आमदार परिणय फुके यांनी याबाबत सभागृहात सवाल केला. राज्यात मेफेड्रोनची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे. ड्रग्सचा विळखा पडतो आहे. आपली संख्या त्यात सर्वाधिक आहे. तस्करीचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे या सर्वांवर मकोका लावून कारवाई करणार का? ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे या केसेस फास्टट्रॅक कोर्टात घेणार का? असा सवाल परिणय फुके यांनी केला होता. राज्यात ठिकठिकाणी ड्रग आणि अमली पदार्थांची तस्करी होतेय. यावर शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. ड्रग्सची तस्करी रोखण्यसाठी टास्क फोर्स केली होती त्याच काय झालं? असा सवाल फुके यांनी केला होता.

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. ड्रग तस्करी संदर्भात मकोका लावत येईल का? यावर आपण या अधिवेशनात नियमावली आणत आहोत. कायद्यात आपण बदल करून ड्रग तस्करी करणाऱ्यावर मकोका लावण्यासंदर्भात कायद्यात सुधारणा करणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.