पोलिस स्टेशनमध्ये अधिकाऱ्याला आरेरावी, व्हिडीओ व्हायरल होताच रोहित पवारांविरोधात गुन्हा
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'आवाज खाली कर, बाहेर जा', असे म्हणत रोहित पवारांनी पोलिस अधिकाऱ्याला आरेरावी केली होती. याचा व्हिडीओ देखील समोर आला होता. यानंतर आता त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदरा गोपीचंद पडळकर यांच्यात सुरूवातीला शाब्दिक बाचाबाची झाली होती. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. विधीमंडळाच्या लॉबीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यांनी एकमेकांना मारहाण केली होती.
या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी थेट मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात धाव घेत ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या हाताला धरून त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्याला आरेरावी केली होती. त्यांच्या हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 'आवाज खाली... बोलता येत असेल तर बोलायचे.. बाहेर जा तुम्ही', अशा शब्दात रोहित पवार पोलिसाला रागात बोलत होते. यावेळी पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
रोहित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोशल मीडिया प्रभारी योगेश सावंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आणि इशाराही दिला. योगेश सावंत यांनी लिहिले की, 'जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास दिला तर रोहितदादा आणि जितेंद्र आव्हाड जी लढायला तयार आहेत. जर तुम्ही आम्हाला दडपण्यासाठी पोलिसांचा वापर केला तर तुम्हालाही असेच उत्तर मिळेल.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.