'गोपीचंद पडळकरांच्या भावानं माझी १७ एकर जमीन हडप केली'
८२ वर्षीय आजी थेट विधानभवनात धडकल्या
मुंबई : खरा पंचनामा
जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या भावाने त्यांच्याच गावातील विठाबाई पडळकर या ८२ वर्षीय आजीची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. तसा आरोप सदर आजीने केला आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. ३ जुलै) या आजीचे कुटुंबीय विधानभवनच्या बाहेर आले होते.
या आजीची १७ एकर जमीन ही गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर याने फसवणूक करून हडप केली असल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी आपल्याला मदत न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी या कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.
दरम्यान, विठाबाई पडळकर यांनी याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे. कैलास वाघमारे (ता. आटपाडी) यांनी माझी फसवणूक करुन माझी शेतजमीन हडप केल्याचे विठाबाईंनी म्हटले आहे. माझ्या पतीचे १० वर्षापूर्वी निधन झाले आहे. माझे वय ८२ वर्षे असून मला लिहिता, वाचता येत नाही. माझे दोन्ही दीर मयत असून आमचे एकत्र कुटुंब आहे. आमच्या शेतजमिनीचे वाटप झालेले नाही. माझा सांभाळ माझे पुतणे करतात. आणेवारीत माझ्या नावे १७ एकर जमीन आहे. ही जमीन माझे पुतणे कसतात. पण ही जमीन फसवणुकीने हडप केल्याचा आरोप विठाबाईंनी आटपाटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.