Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुझ्या घोड्यासहीत तुला अटक करूपोलिसांनी शिवरायांच्या वेषात आलेल्या मुलाला धमकावले

तुझ्या घोड्यासहीत तुला अटक करू
पोलिसांनी शिवरायांच्या वेषात आलेल्या मुलाला धमकावले

मुंबई : खरा पंचनामा

मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा दडपण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. मात्र तरिही मोर्चा ठिकाणी जमलेल्या हजारो मराठीप्रेमी, मराठी एकीकरण समिती, शिवसेना मनसे कार्यकर्ते हे मोर्चा काढण्यावर ठाम होते. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ओमकार भारत करचे हा अकरा वर्षांचा मुलगा मोर्चाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषात आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले. मात्र या मुलाने आपण मोर्चात सहभागी होणारच असा ठाम निर्धार प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवला.

"पोलीस मला म्हणाले की इथून निघून जा नाहीतर तुला व तुझ्या घोड्याला अटक करू. पण मी मोर्चात सहभागी व्हायला आलो होतो. मी अजुनही आंदोलनावर ठाम आहे. मराठी सर्वांना आलीच पाहिजे, असे ओमकारने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.