पोलिस अधिकाऱ्याने पडळकर यांच्या कार्यकर्त्याला मळून दिली तंबाखू...?
मुंबई : खरा पंचनामा
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ज्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे, त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
चव्हाण नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरने गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला वडापाव आणून दिला. तसेच त्याला तंबाखू मळून दिली. पोलिस गुन्हेगारांना तंबाखू मळून देतात, हे चालतं का? त्या इन्स्पेक्टर चव्हाणला निलंबित करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
विधानभवनाच्या लॉबीत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी दुपारी हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पकडून पोलिस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी त्याला ठामपणे विरोध केला. जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे मोजके कार्यकर्ते काल मध्यरात्री नितीन देशमुख यांना पोलिस ठाण्यात घेऊन निघालेल्या पोलिसांच्या गाडीसमोर ठाण मांडून बसले. 'तुम्ही आमच्या अंगावर गाडी चढवा, पण मी गाडी हलू देणार नाही', असा पवित्रा जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. एका क्षणाला तर जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले. तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर करुन जितेंद्र आव्हाड यांना खेचून बाहेर काढले आणि गाडी पुढे नेली.
जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन करत असताना काही गंभीर आरोप केले. पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्या ज्या कार्यकर्त्याला अटक केली आहे, त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. चव्हाण नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरने गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला वडापाव आणून दिला. तसेच त्याला तंबाखू मळून दिली. पोलिस गुन्हेगारांना तंबाखू मळून देतात, हे चालतं का? त्या इन्स्पेक्टर चव्हाणला निलंबित करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
पोलिसांनी विधानभवनातील राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला ताब्यात घेतले. आव्हाडांनी पोलिसांशी हुज्जत घालताना म्हटले की, 'मार खायचा याने आणि तुम्ही याला पोलिस स्टेशनला घेऊन जाणार. पाच जण मारून एकाला पकडता, आता बाकीचे पळून गेले. नितीन देशमुखला मारायला गोपीचंद पडळकरांचे पाच कार्यकर्ते होते, पण पोलिसांनी फक्त एकालाच पकडलं. नितीन देशमुख याने मार खाल्ला आणि पोलिस त्यालाच घेऊन चालले आहेत. या राड्यानंतर विधिमंडळाच्या सुरक्षारक्षकांनी नितीन देशमुख याला ताब्यात घेतले होते. विधिमंडळाचे कोळी नावाचे सचिव आहे त्यांना मी विचारले तेव्हा, त्यांनी मी नितीन देशमुखला सोडतो, असे सांगितले. विधानसभा अध्यक्षांनीही सभागृहाचे कामकाज संपू दे, त्याला सोडतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर मी आणि विधानसभा अध्यक्ष एकत्र बाहेर पडत असताना मला फोन आला की, पोलिस नितीन देशमुखला पोलिस ठाण्यात घेऊन चालले आहेत. आम्ही काय वेडे आहोत का? व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की, नितीन देशमुखला मारायला पाच जण आहेत. पण फक्त एकालाच पोलिसांनी पकडले. त्यालाही तुमचे पोलिस वडापाव आणून देतात आणि तंबाखू मळून देतात. आता इन्स्पेक्टर चव्हाण कुठे गेले, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.