कौटुंबिक कारणातून होणारे खून प्रतिबंधासाठी समुपदेशन कक्ष बळकट करा
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सूचना
कुपवाड येथील खुनप्रकरणी दोघांना अटक
सांगली : खरा पंचनामा
खुनाचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी व्हिजिबल पोलिसिंग वाढवा. कौटुंबिक खुनाच्या घटना रोखण्यासाठी समुपदेशन कक्ष बळकट करा अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कुपवाड येथे झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिली.
कुपवाड येथील अम्हेल सुरेश रायते (वय ३५, राहणार-रामकृष्णनगर, कुपवाड) या तरुणाचा बुधवारी पहाटे खून करण्यात आला होता. याप्रकरणी सांगली एलसीबीने प्रेम बाळासाहेब मद्रासी (वय २४) तेजस संजय रजपूत वय-२५, दोघे रा. रामकृष्ण नगर, कुपवाड ता. मिरज) यांना अटक केली आहे. प्रेम मद्रासी याच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने हा खून केल्याची कबुली दोघांनी दिल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात वाढलेल्या खु्नांच्या घटनांबाबतही सर्व उपाधीक्षक तसेच प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. बहुतांशी खून हे कौटुंबिक कारणातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महिला समुपदेशन कक्ष बळकट करावेत अशा सूचना दिल्या आहेत. तात्कालिक कारणातून होणारे खून रोखण्यासाठी व्हिजिबल पोलिसिंग वाढवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.
त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना
काही खुनाच्या घटनामध्ये वेळीच गुन्हेगारांवर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र अशी कारवाई करण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचेही महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.