महाराष्ट्रातले मोठे मंत्री, अधिकारी हनी ट्रॅपमध्ये; नाना पटोलेंनी विधानसभेत पेनड्राईव्हच दाखवला !
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्रतले मंत्री, मोठे अधिकारी हे हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत, असे नाना पटोले यांनी विधानसभेत बुधवारी सांगितले होते. आज (गुरुवारी) सभागृहात मुंबई मंत्रालय, ठाणे, नाशिक हानी ट्रॅपचे केंद्र बनली आहेत, असे म्हणत पटोलेंनी आपल्याकडे असलेला हातवर करून दाखवला. माझ्याकडे माझ्याकडे पेन ड्रायईव्ह देखील आहे. सरकारचे मत असेल तरी आम्ही तो दाखवूही शकतो, असे पटोले यांनी म्हटले.
'हानी ट्रॅपच्या माध्यमातून राज्याची महत्त्वाची कागदपत्रं अँटी सोशल मूव्हमेंटच्या हातात चालाली आहेत. मला कोणाचे चरित्र हनन करायचे नाही. मात्र, याबाबत सरकार गंभीर नाही. साधे निवेदन करायला तयार नाही. अध्यक्षांनी याबाबत निर्देश द्यावेत.' असे पटोले म्हणाले.
नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण गंभीर आहे, असे आमदार जयंत पाटील म्हणाले. त्यांनी यासारख्या गंभीर मुद्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी निवेदन करायला हवे, अशी मागणी केली. तर, याची दखल घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकरणावर सभागृहात बोलताना गृहज्यमंत्री यांनी मीडियासमोर विधाने करताना नाशिकच्या माणसाने दिलेली तक्रार मागे घेतली आहे, असे म्हटले. त्यामुळे ते सभागृहाची दिशाभूल करत नाही ना याची विचारणा केली. त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जी तक्रार मागे घेण्यात आली ती परस्पर संमतीने मागे घेतल्याचे म्हटले, तसेच केस दिली ती हनी ट्रॅपची नव्हती, असे देखील सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.