सरकारी कार्यालयात बर्थडे केक कापणं गुन्हा?
मुंबई : खरा पंचनामा
सरकारी कार्यालयं, सरकारी नोकरी याबाबत अनेकांनाच अनेकदा अप्रूप वाटत असतं. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनापासून ते अगदी त्यांना मिळणारी विविध प्रकारची मुभा ही अप्रूप वाटण्याची काही कारणं. पण, याच सरकारी कर्मचाऱ्यांना आता म्हणजे एका महत्त्वाच्या नियमाचं पालन करावं लागणार आहे.
हा नियम आहे वाढदिवस साजरा करण्यासंदर्भात. सहसा सरकारी कार्यालय असो किंवा एखादं खासगी कार्यालय, तिथं एखाद्या सहकाऱ्याचा वाढदिवस असल्यास तो सर्वांसमवेत साजरा करण्यालाच अनेकजण प्राधान्य देतात. मात्र सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यापुढं असं करता येणार नाही.
शासकीय कार्यालयात काही अधिकारी व कर्मचारी वाढदिवस साजरा करत असल्याचं निदर्शनास आलं तर थेट कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. मध्यंतरी जिल्हा बँकेचं एक पथक कर्जवसुलीसाठी फिरत असताना बँकेचे काही कर्मचारी वाढदिवस साजरा करण्यासाठी कामकाजाच्या वेळेत हॉटेलमध्ये गेल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. परिणआमी आता यापुढे कार्यालयीन वेळेत वाढदिवस अथवा वैयक्तिक समारंभ साजरा केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार ही कारवाई केली जाणार असल्याचा आदेश शासनाकडून बजावण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच शासकीय आस्थापनांनी या कायद्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979, हा महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू केला आहे. हा नियम शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर आणि कामकाजावर नियंत्रण ठेवतो. या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना कर्तव्ये, अधिकार आणि आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा कायदा लागू असल्याचच इथं स्पष्ट होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.