आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला!
नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर..
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती.
याचे पडसाद शुक्रवारी पहाटेपर्यंत उमटत होते. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तर उलट पोलिसांनी आव्हाड यांच्या मार खाल्लेल्या कार्यकर्त्यालाच ताब्यात घेतल्याचा प्रकार घडल्याने आव्हाड यांनी रात्रभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता.
जितेंद्र आव्हाड यांच्यानुसार, पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली. यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले. शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडले आहे. आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे. म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता, पळून जाणार पडळकरचे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..!
मी इतकच सांगतो, माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही, अशी पोस्ट आव्हाड यांनी एक्सवर केली आहे. तसेच पोलिसांच्या वाहनासमोर बसत आंदोलन करत असल्याचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.