महायुतीत प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव!
बड्या नेत्याच्या गंभीर आरोपामुळे खळबळ
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकमधील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशकातील नेते वसंत गिते यांनी सत्ताधाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे महायुतीत प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप वसंत गिते यांनी केला आहे.
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मागील काही दिवसांपासून मोठी गळती लागली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत डेरेदाखल होत आहेत. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली. मात्र, भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या इनकमिंग बाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांनी गंभीर आरोप केलाय... महायुतीत प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप वसंत गिते यांनी केला आहे. खोटे गुन्हा दाखल करून, ब्लॅकमेलिंग करून पक्षात प्रवेश करायला भाग पाडलं जात असल्याचा आरोप गिते यांनी केला आहे.
नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडेंची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. 4 दिवसांपूर्वीच विलास शिंदेंच्या जागी मामा राजवाडेंची महानगरप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. दरम्यान ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र मामा राजवाडे यांच्या भाजप्रवेशाला ब्रेक लागलाय. संजय राऊतांनी मामा राजवाडे, सुनील बागुल यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. दरम्यान यानंतर या दोघांच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याचं बोललं जात आहे.
पक्ष प्रवेशासाठी आम्हाला पोलिसांची गरज नसल्याचं म्हणत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी हे आरोप फेटाळलेत. तर भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेत कोणीही राहणार नसल्याचं भाकीतही म्हस्के यांनी केलंय. सत्तेत असलेल्या पक्षांनी गृहखात्याचा वापर करणं यामध्ये काही नवीन नाहीय. याआधीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचं राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुके यांनी म्हटलंय. जशा पालिका निवडणुका जवळ येतायत तशा सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश होताना दिसताहेत.. त्यात हे पक्षप्रवेश पोलिसांच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गिते यांनी खळबळ उडवून दिलीय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.