मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न
दगडफेक करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.
रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने शिरसाट यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्याने शिरसाट यांच्या घराच्या परिसरात आरडाओरडही केली आहे. सौरभ घुले असे हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार हल्ला करताना हा तरूण मद्यधुंद अवस्थेत होता. ही घटना समोर येताच याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.