Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणारे अन् सोनं लुटणाऱ्या दोघांना अटक

अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणारे अन् सोनं लुटणाऱ्या दोघांना अटक

दौंड : खरा पंचनामा

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली होती. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना रात्री उशिरा रस्त्यात अडवून लुटल्याची घटना समोर आली होती.

तसेच त्यांच्यासोबतच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना पकडलं असल्याची माहिती समोर आली आहे. मागील दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस या नराधमांचा शोध घेत होते.

पुणे पोलिसांना या प्रकरणात दोघांना पकडण्यात यश मिळालं आहे. अमीर पठाण आणि विकास सातपुते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींनी सोमवारी (दि. 30 जून 2025) रोजी पंढरपुरला देव दर्शनासाठी जात असताना वाटेत चहा प्यायला थांबलेल्या वारकऱ्यांना लुटलेलं होतं. त्याचबरोबर या नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. आज दोन्ही आरोपींना बारामतीतील कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

सोमवारी (दि. 30 जून 2025) पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास काहीजण पुणे-सोलापूर महामार्गावरून चारचाकी वाहनाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतानाच दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले. चहा घेतल्यानंतर सर्वजण पुन्हा कारमध्ये बसत होते. त्याचवेळी दोन अज्ञात हल्लेखोर त्याठिकाणी दुचाकीवर आले. त्यांनी काही कळायच्या आत दोघांनी सोबत आणलेली मिरचीपूड तोंडावर फेकली. यानंतर आरोपींनी महिल्याच्या अंगावरील दीड लाखांचे दागिने लुटले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला फरपटत परिसरातील टपरी शेजारी असलेल्या नाल्याजवळील झाडीत नेलं. याठिकाणी दोघांनीही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. आता पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.