ब्रिटिश नागरिक सततच्या चोरी-दरोड्याला वैतागला अखेर पाकिस्तानचा झेंडा लावला अन...
दिल्ली : खरा पंचनामा
पाकिस्तानची प्रतिमा जगभरात कशी पा आहे, हे आता उघड झाले आहे. पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देतांनाही नकारघंटा लावत आहेत. पाकिस्तानची प्रतिमा जगभरात दहशतवादी बनली आहे. त्याचाच फायदा एका ब्रिटिश नागरिकाने खुद्द स्वतःच्याच देशात घेतला आहे.
हा ब्रिटिश नागरिक रोजच्या चोऱ्या आणि दरोड्याने वैतागला होता, अखेर त्याने स्वतःच्या घरावर पाकिस्तानचा झेंडाच लावला आणि चक्क त्याच्या घरापासून चोर, दरोडे दूर पळाले कारण त्याच्या घरावर आता अमेरिकेतील पोलिसांपासून चक्क राष्ट्रीय सुरक्षा ब्युरो, स्कॉटलंड यार्ड, एमआय-५, एमआय-६, सीआयए आणि युरोपमधील इतर सर्व गुप्तचर सेवा या सर्वांनी करडी नजर ठेवायला सुरुवात केली.
या ब्रिटिश नागरिकाने या आशयाची पोस्ट सोशल मीडियात केली. त्यात त्याने म्हटले की, "माझ्या परिसरात दररोज चोरी आणि दरोडा पडल्याने मी कंटाळलो होतो. अलार्म सिस्टमचा काही उपयोग नव्हता म्हणून मी तो फाडून टाकला आणि आमच्या अकार्यक्षम नेबरहूड वॉचमधून नोंदणी रद्द केली. त्याऐवजी, मी माझ्या बागेच्या प्रत्येक कोपऱ्यात पाकिस्तानी ध्वज लावला आहे. आता, शहर पोलिस, राष्ट्रीय सुरक्षा ब्युरो, स्कॉटलंड यार्ड, एमआय-५, एमआय-६, सीआयए आणि युरोपमधील इतर सर्व गुप्तचर सेवा माझ्या घरावर २४x७४३६५ लक्ष ठेवून आहेत. त्यांचा कामावर जाताना आणि माझी पत्नी बाजारहाट करायला जाताना आमच्या मागे सतत पहारा असतो. म्हणून कोणीही आम्हाला अजिबात त्रास देत नाही. मला कधीही यापूर्वी सुरक्षित वाटले नव्हते... हे सर्व पाकिस्तानचे आभार."
ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. पाकिस्तानी झेंड्यामुळे देशाचे अख्खे संरक्षण खाते संबंधित व्यक्तीच्या मागे लागते, यावरून अमेरिकेत पाकिस्तानी नागरिक अथवा पाकिस्तानचा समर्थक म्हटले की त्या व्यक्तीकडे किती संशयाने पाहिले जात आहे, हेही यावरून दिसून येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.