मिरा भाईंदरच्या पोलिस आयुक्तांची उचलबांगडी
मराठी मोर्चाला परवानगी नाकारणं भोवलं
मुंबई : खरा पंचनामा
काही दिवसांपूर्वी मिरा भाईंदरमध्ये मराठी -अमराठी वाद पेटलेला होता. यादरम्यान तिकडच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मराठी मोर्चा काढण्याचे ठरलेले होते.
यासाठी मनसे, शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीने पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याकडे यासाठी परवानगी मागितली होती. मात्र त्यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली.
यानंतर राज्य शासनानेच मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावरून फडणवीस सरकारवर जोरदार टीका झाली. मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने राज्य शासनाची प्रतिमा खराब झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय घेतला.
निकेत कौशिक मिरा भाईंदरचे नवे आयुक्त मिरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे. त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी निकेत कौशिक यांची मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तपदी वर्णी लावण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत ९ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार, भारतीय पोलीस सेवेतील (भा.पो.से.) दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम २२न मधील तरतुदींनुसार हे बदल करण्यात आले आहेत. निकेत कौशिक, जे यापूर्वी अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे कार्यरत होते, त्यांची आता पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार म्हणून बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, मधुकर पांडे, जे मिरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते, त्यांची बदली करून त्यांना अपर पोलीस महासंचालक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.