Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक 

मुंबई : खरा पंचनामा

पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या (बावधन) नव्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. 

नव्या संग्रहालयात पर्यटक व नागरिकांच्या सोयीसाठी चारचाकी, दुचाकी आणि बससाठी स्वतंत्र पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच, संग्रहालयाचे बांधकाम दर्जेदार, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने व्हावे, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

केळकर संग्रहालयात १४व्या शतकापासूनच्या २०,००० हून अधिक वस्तूंचा संग्रहीत ठेवा आहे. सध्या जागेअभावी केवळ ११% वस्तू सध्या जनतेसाठी खुल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या विस्तारासाठी बावधन बुद्रूक येथे ६ एकर जागा सरकारकडून संग्रहालयाच्या विस्तारासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चर नेमणुकीसाठी प्रशासकीय समितीची स्थापना, तसेच सविस्तर आराखड्यानंतर निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्याने उभारल्या जाणाऱ्या ‘म्युझियम सिटी’ला राजा दिनकर केळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

या बैठकीस आमदार हेमंत रासने, अपर मुख्य सचिव विकास खरगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा तसेच संबंधित विभागांचे प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.