दारु पिऊन वाहतूकीचे नियमन करणारा पोलिस उपनिरीक्षक निलंबित
पुणे : खरा पंचनामा
मद्यप्राशन करून कर्तव्यावर आलेल्या पोलिस उपनिरीक्षक संजय सुधाकर माटेकर यांच्यावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिले.
पोलिस उपनिरीक्षक माटेकर यांची नेमणूक लष्कर वाहतूक विभागात आहे. २९ जुलैच्या मध्यरात्री सुमारास ते ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह कारवाईसाठी कर्तव्यावर होते. यावेळी त्यांनी एक चारचाकी गाडी थांबवून गाडीतील तिघांशी वाद घातला. त्यावेळी ते स्वतः दारूच्या नशेत असल्याचे समोर आले.
ही बाब स्पष्ट होताच माटेकर यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस खात्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे वर्तन आणि कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.