पोलिसांकडे 'अलादीन का चिराग' नाही, सर्व IPS अधिकाऱ्यांचे निलंबन मागे
चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार; CAT चा निर्णय
बेंगळूरू : खरा पंचनामा
आयपीएल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम जबाबदार असल्याचं केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाने (CAT) म्हटलं आहे.
एवढ्या कमी वेळात गर्दी नियंत्रित करायला पोलिस काही जादूगर नाहीत किंवा त्यांच्याकडे 'अल्लादिनचा चिराग' नाही असंही कॅटने म्हटलं. या प्रकरणी सरकारने निलंबित केलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
आयपीएल जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या समर्थनार्थ (RCB) 4 जून 2025 रोजी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र या स्टेडिअमबाहेर चेंगराचेंगरीची घटना झाली आणि त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता.
बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी बंगळुरुचे पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं. त्या विरोधात आयपीएस अधिकारी विकास कुमार यांनी कॅटमध्ये धाव घेतली होती.
बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कॅटने प्रथमदर्शनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम व्यवस्थापनाला जबाबदार ठरवलं आहे. ट्रिब्युनलने नमूद केलं की, RCB ने सोशल मीडियावर विजयी मिरवणुकीचं आमंत्रण पोस्ट केलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. मात्र, पोलिसांना योग्य व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, कारण RCB ने पोलिसांची पूर्वपरवानगी किंवा संमती घेतली नव्हती.
CAT ने वरिष्ठ IPS अधिकारी विकास कुमार यांचं निलंबन रद्द केलं. त्यांना या चेंगराचेंगरी प्रकरणात निलंबित करण्यात आलं होतं. ट्रिब्युनलने राज्य सरकारने निलंबनाचा निर्णय घाईघाईने आणि पुरेशा पुराव्यांशिवाय घेतल्याचं म्हटलं आहे. CAT ने असंही नमूद केलं की पोलिसांकडे 'अलादीन का चिराग' नाही की ते 12 तासांत 3 लाख लोकांची व्यवस्था करू शकतील.
RCB ने IPL चे विजेतेपद जिंकल्यानंतर 4 जून 2025 रोजी बेंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विजयी मिरवणूक आयोजित केली होती. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमली, ज्यामुळे चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिक जण जखमी झाले.
दरम्यान, चेंगराचेंगरीच्या या घटनेनंतर बंगळुरुच्या कबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये आरसीबी, डीएनए (इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी), केएससीए प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 105, 125 (1) (2), 132, 121/1, 190 R/w 3 (5) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगळुरू चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकल डी कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या घटनेला जे कुणी कारणीभूत असतील त्यांना अटक करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.