मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या OSD मध्ये जुंपली ! पायताणाने मारण्याची धमकी
बंगळूरू : खरा पंचनामा
राजकीय पक्षांमधील वाद आणि आरोप-प्रत्यारोप नेहमीच रा चर्चेत असतात. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या OSD म्हणजेच विषेश अधिकाऱ्यांमध्येच जुंपली असून सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी (ओएसडी) आणि उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी यांच्यात जोरदार वादावादी झाली आहे. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता त्याची अधिकृत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्लीतील कर्नाटक भवन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी कोणत्याही राजकीय घडामोडींसाठी नाही तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील झालेल्या वादावादीवरून याची चर्चा होत आहे. कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी (ओएसडी) आणि उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी यांच्यात जोरदार वादावादी झाला आहे. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता त्याची अधिकृत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सहाय्यक निवासी आयुक्त आणि विशेष अधिकारी मोहन कुमार सी. यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे विशेष अधिकारी एच. अंजनेय यांना धमकी दिल्याचा आरोप केला आहे. मोहन कुमार यांनी अंजनेय यांना इतर कर्मचाऱ्यांसमोर "बूट काढून मारहाण करण्याची" धमकी दिल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर गट-ब अधिकारी एच. अंजनेय यांनी कर्नाटकचे निवासी आयुक्त आणि मुख्य सचिवांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. अंजनेय यांनी आरोप केला आहे की मोहन कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांना सतत त्रास दिला जात आहे आणि त्यांच्या कामात अडथळा आणला जात आहे. या घटनेनंतर कर्नाटकच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या चौकशीतून काय निष्पन्न होते आणि कर्नाटक सरकार त्यांच्या अधिकाऱ्यांमधील या सार्वजनिक संघर्षावर काय कारवाई करते. याबाबत चर्चा होत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.