Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

10.2 लाखांची लाच घेताना कस्टम अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात

10.2 लाखांची लाच घेताना कस्टम अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात

मुंबई : खरा पंचनामा

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शनिवारी रात्री नवी मुंबईतील खारघर येथून एक धक्कादायक कारवाई करत सहार एअर कार्गो येथे तैनात असलेले कस्टम अधीक्षक कृष्ण कुमार यांना १०.२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. ही अटक त्यांच्या निवासी वसाहतीमध्ये थरारक पाठलागानंतर करण्यात आली.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आयात केलेल्या मालाची क्लिअरन्स लवकर व्हावी यासाठी कुमार याने लाच मागितली होती. यासोबतच, भविष्यातील व्यवहारांसाठी प्रति किलो १० रुपयांचे 'रेट कार्ड' ही ठरवले गेले होते. विशेष म्हणजे कुमार याने छद्म ईमेल आयडीचा वापर करून सीबीआयच्या रमॅजिंग अॅण्ड इंटेलिजन्स (R&I) शाखेच्या मदतीने तक्रारदाराचा माल मुद्दाम रोखून ठेवला होता.

शनिवारी रात्री कुमार यांनी तक्रारदाराला खारघर येथील त्यांच्या इमारतीबाहेर बोलावले आणि गाडीत लाच स्वीकारली. मात्र, तिथेच सीबीआयने सापळा रचून पाठलाग सुरू केला. पाठलागाच्या दरम्यान संशय येताच कुमार यांनी गाडीतून लाचेची रक्कम असलेली बॅग फेकून दिली. त्यानंतर सोसायटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना सीबीआयने त्यांना अटक केली.

सीबीआयने पुढील तपासात असेही उघड केले की, कृष्ण कुमार आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने मालाच्या क्लिअरन्ससाठी लाच मागितली जात होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिल्यानंतरच त्याने सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने २५ जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान दोघांमधील अनेक संभाषणांचे रेकॉर्डिंग केले असून त्यामध्ये कुमार यांनी आधीच्या व्यवहारांसाठी ६ लाख रुपये आणि सध्याच्या क्लिअरन्ससाठी १० लाख रुपयांची मागणी करताना स्पष्टपणे ऐकायला मिळते.

कुमार यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना ६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. सीबीआय सध्या या प्रकरणात R&I शाखेतील अधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.