Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यात 15 हजार पलिसांची पदे भरणारमंत्रिमंडळातील चार मोठे निर्णय

राज्यात 15 हजार पलिसांची पदे भरणार
मंत्रिमंडळातील चार मोठे निर्णय

मुंबई : खरा पंचनामा

देवेंद्र फडणवीस सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये चार मोठे निर्णय घेतले आहेत, त्यात सर्वात मोठा निर्णय म्हणजे गृहविभागात तब्बल 15 हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. हा खूप मोठा निर्णय असून यापुर्वी एवढ्या पदांसाठी एकाचवेळी कधीही भरती झाली नाही अशी माहिती आहे.

आज झालेल्या बैठकीत राज्यातील रास्त दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा निर्णय तसेच सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासासाठी निधी आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह कर्ज संबंधित योजनेत शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढही देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ निर्णय
(गृह विभाग)
महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी
(अन्न, नागरी पुरवठा विभाग)
राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
(विमानचालन विभाग)
सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय
(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची खूप महत्त्वाची भूमिका असते आणि राज्यात वाढती लोकसंख्या पाहता आता पोलिसांची संख्या ही वाढवणे आवश्यक आहे या दृष्टीने राज्य सरकार काम करत आहे त्यामुळे पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी असून 15, 000 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे या संदर्भात गृह विभागात कडून मान्यता देण्यात आली होती, त्यानंतर आता मंत्रिमंडळानेही आजच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये मंजुरी दिली. दरम्यान पोलीस भरती ही ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू होईल असा अंदाज आहे पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

15 हजार पदांच्या भरतीमध्ये बँड्समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार आदी पदांचा समावेश आहे. उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे. म्हणजेच एकाचवेळी ही परीक्षा असेल आणि एकाच पदासाठी उमेदवार प्राप्त राहील अशी प्राथमिक माहिती आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.