Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कार चोरणाऱ्या पुण्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक 16.50 लाखांच्या दोन कार जप्त : इस्लामपूर पोलिसांची कारवाई

कार चोरणाऱ्या पुण्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक 
16.50 लाखांच्या दोन कार जप्त : इस्लामपूर पोलिसांची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

इस्लामपूर शहर परिसरातून कार चोरणाऱ्या पुणे जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 16.50 लाखांच्या दोन कार जप्त करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.

ललीत दिपक कोल्लम (वय ३८), नंदलाल दिलीप होले (वय ३०, दोघे रा. ठाकुर पिंपरी खेड राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. इस्लामपूर येथील सदाशिव मस्के यांची कार दि. 28 जुलै रोजी चोरीला गेली होती. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्याना पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. निरीक्षक हारूगडे यांना इस्लामपूर येथून चोरलेली स्विफ्ट कार (MH 12 HZ 2291) पुणे-बंगळूरू मार्गाने कोल्हापूरकडे जात असल्याची माहिती मिळाली. ती कार नेर्लेजवळ अडवली. कार चालक ललित कोल्लम याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने ती इस्लामपूर येथून चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याचा साथीदार नंदलाल होले गुन्ह्यात वापरलेली कार (MH 14 KW 2321) घेऊन पाठीमागून येत असल्याचे सांगितले. त्यालाही पथकाने कारसह पकडले.

दोघांकडील कार जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. यातील कोल्लम याच्यावर याचेवरती विविध जिल्हयात एकुण २८ घरफोडीचे व २ खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तर होले याच्यावर शरीराविरुद्ध व जबरी चोरीचे गुन्हे दाखल असुन तो मोक्का न्यायालयातुन जामीनावर बाहेर आहे.

इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर वरुटे, शशिकांत शिंदे, अमोल सावंत, दिपक घस्ते, विशाल पांगे, सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील, अजित पाटील, विवेक सांळुखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.