Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पवईत तब्बल 44 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, रंगांआड सुरु होती ड्रग्ज तस्करीअंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई

पवईत तब्बल 44 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, रंगांआड सुरु होती ड्रग्ज तस्करी
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई

मुंबई : खरा पंचनामा

रंगांच्या गोडाऊनमध्ये छापा टाकून साकीनाका पोलिसांनी तब्बल ४४ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि इतर साहित्य हस्तगत केले आहे. पालघर, कर्नाटक आणि आता पवई येथून छापा टाकून जप्त केलेला एकूण ड्रग्जसाठा साडेचारशे कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

या मोहीमेची सुरुवात एप्रिल महिन्यात झाली. एप्रिल महिन्याच्या अखेरीस साकीनाका पोलिसांनी ५३ ग्रॅम एमडी ड्रग्जसह एकाला अटक केली होती. त्याच्या चौकशीमध्ये काही आरोपींची नावे समोर आली. त्यांची धरपकड केल्यानंतर वसईतील कामणगाव येथील 'एम के ग्रीन', 'ए ए सी ब्लॉक' कंपनीत एमडीच्या कारखान्याची माहिती पथकास प्राप्त झाली. पथकाने या कंपनीत छापा घातला. तेथे आठ कोटी रुपये मूल्य असलेले सुमारे साडेचार किलो एमडी आणि आवश्यक रसायने, यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. त्यानंतर आणखी आरोपींना अटक केल्यानंतर कर्नाटक येथे छापा टाकून सुमारे चारशे कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

पालघर आणि कर्नाटक येथे छापा टाकून विक्रेत्यांपासून उत्पादकांपर्यंत रॅकेट उघडकीस आरोपींच्या चौकशीमध्ये पालघर आणि कर्नाटक येथून आणलेले ड्रग्ज मुंबईत वितरित करण्यापूर्वी पवई येथील रंग बनविण्याच्या कारखान्यात ठेवले जात असल्याचे समजले. साकीनाका पोलिसांनी रंग बनविण्याच्या कारखान्यात छापा टाकला. रंगाच्या ड्रममध्ये लपवून ठेवलेले सुमारे ४४ कोटी रुपयांचे आणखी एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे पाचशे किलो केमिकलही या कारवाईत पोलिसांच्या हाती लागले.

परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय क्षीरसागर, सहायक निरीक्षक दयानंद वणवे, उपनिरीक्षक पंकज परदेशी, शशिकांत पाटील, चंद्रकांत पवार, नितीन खैरमोडे, अनिल करांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.