पोलीस असल्याची बतावणी करून चिपळूणच्या वृद्धेकडील दागिने चोरणाऱ्याला अटक
5.25 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरजेतील शिवाजी रोड येथे चालत जाणाऱ्या चिपळूण येथील वृद्धेकडील सोन्याच्या बांगडया पोलीस असल्याची बतावणी करून चोरणाऱ्या मिरजेतील एकाला अटक करण्यात आली. येथे त्याच्याकडून 5.25 लाखाचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
जहीर अब्बास सलीम काझी (वय ४०, रा. दर्याजवळ, बनेली टिटवाळा जि. ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 23 जून रोजी सकाळी सवादहाच्या सुमारास कावीळतळी चिपळूण येथील रूकेय्या साबळे मिरजेतील शिवाजी रस्ता येथे चालत निघाल्या होत्या. त्यावेळी दोन अज्ञातानी आम्ही पोलीस असल्याचे सांगत पुढे अपघात झाला असून चेकिंग सुरु असून तुमच्याकडील दागिने काढून ठेवा असे सांगत हातचलाखी करत त्यांच्याकडील दागिने लंपास केले. हे लक्षात आल्यावर साबळे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
यातील चोरट्याना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे विशेष पथक तयार केले होते. पथकातील सागर लवटे यांना हा गुन्हा टिटवाळा येथील काझी याच्यासह त्याच्या साथीदाराने केल्याची माहिती मिळाली पथकाने तेथे जाऊन माहिती घेतल्यावर काझी माधवनगर येथे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने तेथे सापळा रचून काझी याला अटक केली. त्याच्याकडून 5.25 लाखाचे दागिने जप्त करण्यात आले. त्याला महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, नितीन सावंत, सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, दऱ्याप्पा बंडगर, सागर टिंगरे, अमर नरळे, सतिश माने, संदिप गुरव, मच्छींद्र बर्डे, संदिप नलावडे, उदयसिंह माळी, विक्रम खोत, केरुबा चव्हाण, सुशांत चिले, सुरज थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.