Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बांधकाम साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक 5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त : तासगाव पोलिसांची कारवाई

बांधकाम साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक 
5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त : तासगाव पोलिसांची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

तासगाव तालुक्यातील ढवळी येथील बांधकामाचे साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

अर्जुन दादासो कोरटे (वय २१), संकेत चंद्रकांत सुर्वे (वय २३), प्रभु राजाराम भिसे (वय २१, सर्व रा. विटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ढवळी येथे बांधकाम सुरु होते. तेथील साहित्य दि. 9 ऑगस्ट रोजी चोरून नेल्याची फिर्याद अमीर मुल्ला यांनी दिली होती. तासगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. ही चोरी अर्जुन कोरटे याने केल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने अन्य दोन साथीदारांसोबत ही चोरी केल्याची कबुली दिली. अन्य दोघांना अटक करून त्यांच्याकडून 5.60 लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.

तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अमित परीट, अमोल चव्हाण, सागर मगदुम, प्रशांत चव्हाण, विवेक यादव, विठ्ठल सानप, अमित पवार, अर्जुन मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.