दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक : 7.20 लाखांच्या 12 गाड्या जप्त
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील गुन्हे उघड : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आणत 7.20 लाखांच्या 12 गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
सूरज उमेश ओमासे (वय १९, रा. बोलवाड रोड), ओंकार महेश तांदळे (वय २१, रा. मातंग समाज, नागरगोजे कुडी रोड, बेडग), योगेश विजय मिरजे (वय २३, रा. मारुती मंदीर जवळ, आरग, ता. मिरज), वैभव प्रकाश रोमन (वय २९, रा. आरग रेल्वे स्टेशन, आरग, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दाखल वाहन चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्याना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचे एक पथक तयार केले होते. पथकातील इम्रान मुल्ला यांना एक तरुण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी मिरजेतील ढोर गल्ली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून विना क्रमांकाची दुचाकी घेऊन आलेल्या सूरज ओमासे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकी बाबत चौकशी केल्यावर त्याने त्याचा मित्र ओकार तांदळे याने दुचाकी चोरलेली असून त्याने ती विक्री करीता दोन दिवसापुर्वी दिली होती. सदरची मोटार सायकल विक्री केल्यानंतर तो त्याला पैसे देणार असल्याने तो दुचाकी विक्री करण्यासाठी गिहाईकच्या शोधात आला असल्याची कबूली दिली.
त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने त्याचा मित्र ओंकार तांदळे याने चोरी केलेल्या काही दुचाकी जैव विविधता उदयान, बोलवाड येथे लावल्या असल्याचे सांगितले, त्यानंतर तेथे जाऊन ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच योगेश मिरजे याचेकडे चोरीची दुचाकी असून तो तासगाव ते तानंग फाटा रोडवर येणार असलेबाबत माहिती मिळाल्याने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेऊन दुचाकी जप्त करून चौकशी केल्यावर त्याचा मित्र वैभव रोमन याने चोरी केलेल्या दुचाकी आरग रेल्वे स्टेशन जवळील वैभव रोमन याचे जुने बंद घराजवळ लावल्याचे सांगितले. तेथे जावून पथकाने वैभव रोमन याचा शोध घेवून त्याचे बंद घराजवळून ४ मोटार दुचाकी जप्त केल्या.
त्यांच्याकडून सांगली जिल्हयातील मिरज शहर, एम.आय.डी.सी कुपवाड, तासगाव, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, कोल्हापुर जिल्हयातील शिरोळ आणि कुरुंदवाड पोलीस ठाणे आणि कर्नाटक राज्यातील रायबाग पोलीस ठाणे येथील आठ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. त्यांना मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, जयदिप कळेकर, सायबर पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक रुपाली बोबडे, अनिल ऐनापुरे, इम्रान मुल्ला, अतुल माने, मच्छिद्र बर्डे, उदय सांळुखे, संदीप पाटील, अनंत कुडाळकर, बाबासाहेब माने, रणजित जाधव, अमर नरळे, अभिजीत माळकर, सोमनाथ पंतगे, शिवाजी शिद, गणेश शिंदे, सुशांत चिले, सायबर पोलीस ठाणेकडील अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.