स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच पोलिसाची आत्महत्या
भायंदर : खरा पंचनामा
स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाच, भाईंदर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 24 वर्षीय पोलीस शिपायाने गुरुवारी दुपारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, पोलीस कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत पोलीस शिपायाचे नाव रितिक भाऊसाहेब चव्हाण (24) असून, ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी होते. 2023 मध्ये मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात भरती झाल्यानंतर त्यांची नेमणूक भाईंदर पोलीस ठाण्यात झाली होती. सध्या ते भाईंदर पश्चिमेतील बेकरी गल्लीमध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यास होते.
गुरुवारी दुपारी रितिक चव्हाण हे आपल्या राहत्या घरात एकटे असताना त्यांनी गळफास घेतल्याची घटना समोर आली. बराच वेळ घर बंद असल्याने आणि कोणतीही हालचाल जाणवली नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात डोकावून पाहिल्यानंतर रितिक यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.