डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे रावसाहेब पाटील, प्रशांत अवधूत यांचा गौरव
सांगली : खरा पंचनामा
तिर्थंकर एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी, कसबे डिग्रज तर्फे संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांची दक्षिण भारत जैन सभा या प्रतिष्ठित संस्थेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच संचालक प्रशांत अवधूत यांची दक्षिण भारत जैन सभा संचलित शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग, सांगलीचे चेअरमन म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य प्रा. डॉ. किरण वाडकर यांनी केली. यावेळी रावसाहेब पाटील यांचा सत्कार महावीर दादा चौगुले यांच्या हस्ते, तर प्रशांत अवधूत यांचा सत्कार प्रा. डी. डी. चौगुले सर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रणाली शहा यांनी केले. या वेळी संस्थेचे संचालक अजित फराटे व नितीन चौगुले, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.