Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईत भरपावसात मराठा बांधवाचा अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबईत भरपावसात मराठा बांधवाचा अंगावर डिझेल  ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : खरा पंचनामा

मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका आझाद मैदानालाही बसलाय. मैदानावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय, चिखल झाला आहे. मात्र या सगळ्या अडचणींवर मात करत मराठा आंदोलकांचा उत्साह अजूनही कायम आहे. मराठा आंदोलकांनी सीएसएमटीनंतर आता चर्चगेट स्टेशन काबीज करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील जोरदार पावसाने आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशात, आडोसा घेण्यासाठी मराठा आंदोलक विविध ठिकाणी आसरा घेताना दिसत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर एका मराठा आंदोलकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी, आंदोलकाने अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच आंदोलनकर्त्यांला थांबवण्यात आल्याने अनर्थ टाळला, मराठा बांधवांनी त्याच्या हातातील डिझेल बाटली घेतली. तर, पोलीसही तात्काळ धावल्याचं दिसून आलं.

पावसामुळे आझाद मैदानावर चिखल झाला असून मराठा बांधव आडोसा शोधत आहेत, त्यातून रेल्वे स्थानकावरही ते गर्दी करत आहेत. काही वेळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हलगीच्या तालावर आंदोलनकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला होता.

मोठ्या संख्येने मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एकत्र आले, त्यानंतर सर्वानी मिळून जल्लोष केला. सेल्फी आणि व्हिडिओ काढत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही केली. आंदोलनस्थळ असलेल्या आझाद मैदानाची क्षमता संपल्यानंतर आंदोलनकर्त्यांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आणि चर्चगेट परिसरात मोठी गर्दी केली आहे.

दरम्यान, मराठा आंदोलक मंत्रालयाच्या बाहेरही दाखल झाले होते. मंत्रालयाच्या समोरही मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी पाहायला मिळाली. मराठा आंदोलकांनी आज मुंबई जाम केली असून अनेक ठिकाणी वाहतूक जाम झाल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे पनवेलहून अनेक बांधव लोकल ट्रेनने मुंबईत आले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.