मुंबई हायकोर्ट सुट्टीवर आहे का?
राज ठाकरेंवरील याचिकेबाबत सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
नवी दिल्ली : खरा पंचनामा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलंय. याचिकेवर सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू होती. सुनावणी सुरू होताच सरन्यायाधीश गवई यांनी याचिकाकर्त्यांना वकिलांनी प्रश्न विचारला की, मुंबई उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का? सरन्यायाधीशांच्या एका प्रश्नावरच याचिकाकाकर्त्यांनी याचिका मागे घेण्याची विनंती केली.
उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयातली याचिका मागे घेतली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, आम्ही स्पष्ट करतो मागे घेतली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, आम्ही स्पष्ट करतो की प्रकरणाच्या गुण-दोषांवर कोणताही विचार केला नाही. त्यांना उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिलीय.
महाराष्ट्रात मराठी न बोलण्यामुळे उत्तर भारतीयांवर राज ठाकरे यांनी निशाणा साधला होता. त्याशिवाय मारहाण, अमराठी लोकांना धमक्या देण्याचे प्रकार यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. शुक्ला यांनी मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अनेकदा विनंती करूनही महाराष्ट्र सरकार किंवा पोलिसांनी यावर उत्तर दिलं नसल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केलाय.
उत्तर भारतीयांच्या अधिकारांची बाजू घेतल्यानं मनसे आणि त्यांच्या सहकारी गटांकडून टार्गेट करण्यात आलं. धमक्या देत छळ केला गेल्याचा आरोपही याचिकेत केला आहे. ३० मार्च रोजी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भावना भडकावणारे भाषण केलं होतं आणि हिंदी बोलणाऱ्या उत्तर भारतीयांविरोधात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या असं याचिकेत म्हटलंय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.