मराठ्यांचा आग्यामोहोळ!
समाज बांधवांची मुंबईकडे कूच
मुंबई : खरा पंचनामा
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केली आहे. अंतरवाली सराटीतून त्यांनी मुंबईकडे कूच केली असून त्यांच्यासोबत लाखो समाजबांधव आहेत. जरांगे यांच्यासोबत शेकडो गाड्यांचा मोठा ताफा असून प्रवासासाठी तसेच आंदोलनासाठी अत्यावश्यक गोष्टी सोबत घेण्यात आल्या आहेत.
मनोज जरांगे हे 28 ऑगस्ट रोजी मुंबईच्या वेशीवर धडकणार असून त्यानंतर 29 ऑगस्टपासून आंदोलन करणार आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी, केसेस मागे घेण्यात याव्यात यासह काही मागण्यांसाठी मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत. पूर्वपरवनगीशिवाय मुंबईत आंदोलन करण्यास हायकोर्टानं मनाई केल्यानंतरही, मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं कूच केली आणि वाटेतच मनोज जरांगेंना सरकारकडून सरप्राईज मिळालं.
मनोज जरांगेंना मुंबईत एक दिवस आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. अर्थात ही परवानगी अटीशर्थांसह देण्यात आली. तारखेला फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन करण्याची मुभा असेल. तसंच आझाद मैदानावर पाच हजार आंदोलकांनाच एन्ट्री असेल असं परवानगी देताना म्हटलं गेलं आहे. राज्य सरकारकडून राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत शिष्टाई करणार आहेत. जरांगेंच्या मनधरणीची जबाबदारी या दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.