झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
दिल्ली : खरा पंचनामा
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे आज (दि. ४) दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी निधनाची माहीती दिली.
'दिशोम गुरुजी' या नावाने प्रसिद्ध असलेले शिबू सोरेन हे झारखंडच्या राजकारणातील एक मोठे व्यक्तिमत्व होते. ते गेल्या ३८ वर्षांपासून झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख नेते होते. पक्षाचे संस्थापक संरक्षक म्हणून त्यांची ओळख होती आणि झारखंडच्या राजकारणात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेक राजकीय लढाया जिंकल्या. त्यांच्या निधनाने केवळ झारखंड मुक्ती मोर्चाचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
८१ वर्षीय शिबू हे गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात नियमित उपचार घेत होते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी २४ जून रोजी त्यांच्या वडिलांच्या रुग्णालयात दाखल झाल्याबद्दल सांगितले होते की, "त्यांना नुकतेच येथे दाखल करण्यात आले होते, म्हणून आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो आहोत. त्यांच्या आरोग्याच्या समस्या तपासल्या जात आहेत," असे सांगितले होते. आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी वडिलांच्या निधनानंतर 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक पोस्ट लिहीली आहे. 'आदरणीय दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. आज मी शून्य झालो आहे...' असे त्यांनी लिहिले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.