आधी PM मोदी आणि नंतर अमित शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
वेगवेगळ्या चर्चांना उधाण
दिल्ली : खरा पंचनामा
दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बिहारमधील एसआयआरवरून सभागृहात बराच गोंधळ झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता गृहमंत्री अमित शहा यांनीही राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही जबाबदार पदे सांभाळत आहेत. त्यामुळे या भेटी सामान्य नाहीत. जेव्हा पंतप्रधान आणि गृहमंत्री राष्ट्रपतींना भेटतात तेव्हा ती औपचारिक बैठक असते किंवा ते एखादा खास प्रसंग असतो. मात्र दोन्ही नेत्यांनी एकाच दिवशी भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
राजकीय विश्लेशकांच्या मते संसदेत एखादे महत्वाचे विधेयक सादर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सरकार मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असल्याचे यातून स्पष्ट होते. मात्र या भेटीवर सरकारकडून कोणतेही विधान आलेले नाही, मात्र या भेटींमागे नक्कीच काहीतरी दडलेलं असण्याची शक्यता आहे.
जर केंद्र सरकारला एखादा मोठा संवैधानिक किंवा राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर त्याबाबत चर्चेसाठी ही भेट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही भेट एखाद्या महत्वाच्या नियुक्तीबाबतही असू शकते. तसेच उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीबाबतही यात चर्चा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जात आहे. याबाबत आणि ईशान्येकडील राज्यामध्ये बांगलादेशशी संबंधित घुसखोरीबाबत सरकारची काय भूमिका आहे याबाबत राष्ट्रपतींना माहिती दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधेयक- पावसाळी अधिवेशनात अनेक विधेयके मांडली जाणार आहेत. यात समान नागरी संहिता (UCC) किंवा एक देश एक निवडणूक यांचा समावेश आहे. याबाबत राष्ट्रपतींना पूर्व माहिती देण्यासाठी ही भेट झाल्याची शक्यता आहे.
संसदेच्या अधिवेशनादरम्यान बऱ्याचदा मंत्री आणि नेते राष्ट्रपतींना भेटणे टाळतात, मात्र आता हे दोन्ही नेते भेटण्यासाठी गेले असल्याने यामागे काही खास कारण असण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी आता काहीतरी नवीन गेम प्लॅन आहे असं म्हटलं आहे. काहींनी उपराष्ट्रपती निवडणूक, एसआयआर ड्राइव्ह किंवा संसदेतील विधेयकाबाबत भेट घेतल्याचे भाकित केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.