भांडवलाच्या जोरावर प्रभारी पद टिकवण्याचे प्रयत्न
सांगली : खरा पंचनामा
भांडवलाच्या जोरावर काहींनी प्रभारी पद टिकवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोणत्याही परिस्थितीत 8 लक्ष होनांची मनसबदारी सोडायची नाही असा चंगच संबंधितानी बांधला आहे. यासाठी आता गॉडफादरला साकडे घालण्यात येत आहे. त्यामुळे भांडवलाच्या जोरावर प्रभारी पद टिकणार का अशी चर्चा आता होत आहे.
सेनापतीने आठ खून माफ केल्याचा गैरसमज करून घेऊन सध्या संबंधिताची वाटचाल सुरु आहे. आतापर्यंत केवळ काही लक्षच होन मिळत असल्याचे सांगून सेनापती, गॉडफादरला अंधारात ठेवणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. आठ लक्ष होनांची मनसबदारी असल्याचे जगजाहीर झाल्याने आता त्या प्रभारीची चांगलीच अडचण झाली आहे.
मनसबदारीच्या आकडयासह केलेल्या कामांच्या भांडवलाची यादीच आता अन्य इच्छुक मनसबदार, सेनापती, गॉडफादर यांच्यासमोर आली आहे. या संकटातून वाचण्यासाठी विविध देवांसमोर 'दीपक' प्रज्वलीत केले जात आहेत.
एकंदरीत 8 लक्ष होनांची मनसबदारी टिकवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चाही होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.