राज्य सरकारचं कौतुक करणं महिला आमदाराला महागात; पक्षातून हकालपट्टी
लखनऊ : खरा पंचनामा
उत्तर प्रदेश विधानसभेच्या अधिवेशना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारचं कौतुक करणं महिला आमदाराला महागात पडलंय. समाजवादी पार्टीने आमदार पूजा पाल यांची पक्षातून हकालपट्टी केलीय.
पूजा पाल यांचे पती राजू पाल यांची अतिक अहमदच्या गँगने हत्या केली होती. प्रयागराजमध्ये घडलेल्या हत्याकांड प्रकरणातील अतिक अहमदसह त्याच्या गँगचा युपी पोलिसांनी सुपडा साफ केलाय. याबद्दल पूजा पाल यांनी विधानसभेत भरअधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं आभार मानलं होतं.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पूजा पाल यांच्या हकालपट्टीनंतर पत्र पाठवलं आहे. यात म्हटलं की, तुम्हाला स्पष्ट समजावल्यानंतरही पक्षविरोधी कारवाया थांबलेल्या नाहीत. यामुळे पक्षाचं नुकसान होत आहे. तुम्हाला समाजवादी पार्टी आणि इतर सर्व पदांवरून तातडीने हटवण्यात येत आहे.
आमदार पूजा पाल यांनी अधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. व्हिजन डॉक्युमेंट २०४७ वर २४ तास मॅरेथॉन चर्चा झाली होती. यात पूजा यांनी म्हटलं होतं की, मी माझा पती गमावलाय. सगळ्यांना माहितीय की माझ्या पतीची हत्या कशी झाली, कुणी केली?
मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानते, त्यांनी मला न्याय दिला. माझं कुणी ऐकलं नाही तेव्हा त्यांनी माझं म्हणणं ऐकलं. मुख्यमंत्र्यांनी प्रयागराजमध्ये माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय दिला आणि गुन्हेगारांना शिक्षा दिली. अतिक अहमद सारख्या गुन्हेगारांना मातीत मिसळलं. आज अख्खा उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांकडे विश्वासाने पाहतोय असंही पूजा पाल म्हणाल्या होत्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.