खानापूर येथे चेन स्नॅचिंग करणाऱ्या तरुणाला अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
खानापूर येथील कार्वे रस्त्यावर अंडी कुठे मिळतात असे विचारण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील बोरमाळ लंपास करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीची 70 हजारांची बोरमाळ जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
सचिन बजरंग शिंदे (वय २८, रा. मंगरुळ, ता. खानापुर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी खानापूर येथील कार्वे रस्त्यावरून निर्मला शिंदे जात होत्या. त्यावेळी सचिन शिंदे याने त्यांना इथे अंडी कुठे मिळतात असे विचारले. त्यानंतर त्याने शिंदे याने त्यांच्या गळ्यातील बोरमाळ हिसडा मारून नेली. याबाबत शिंदे यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. चोरट्याला पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे विशेष पथक तयार केले होते.
पथकातील सूर्यकांत साळुंखे यांना एक तरुण विट्यात चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने पारे रस्ता परिसरात सापळा रचून तरुणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ बोरमाळ सापडली. त्याबाबत कसून चौकशी त्याने कार्वे रस्ता येथे महिलेच्या गळ्यातून ती चोरल्याची कबुली दिली. ती जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला विटा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, सुर्यकांत सांळुखे, हणमंत लोहार, सोमनाथ गुंडे, अतुल माने, चालक शिद, प्रमोद साखरपे, अभिजित ठाणेकर, सुनिल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.